उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणे एका मुस्लिम तरुणाला महागात पडले आहे. पोलिसांनी या तरुणाला केवळ अटक केली नाही तर त्याला माफीही मागायला लावली. आरोपीच्या माफीचे फोटो समोर आले आहेत.
मुझफ्फरनगरच्या शाहपूर पोलिस स्टेशन परिसरातील कमालपूर गावातील रहिवासी असलेल्या अबाज खान या मुस्लिम तरुणाने सीओ संभल अनुज चौधरी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट पोस्ट केली होती. वादग्रस्त पोस्टर व्हायरल झाल्यानंतर मुझफ्फरनगर पोलिसांनी कारवाई करत आबाज खानला अटक केली. अटकेनंतर मुस्लिम तरुण तुरुंगातून माफी मागताना दिसला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी अनुज चौधरी हे त्यांच्या होळीबाबत दिलेल्या विधानावरून चर्चेत आले. सीओ अनुज चौधरी यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन केले होते की ज्यांना होळीच्या रंगांची समस्या आहे त्यांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी म्हटले होते की ज्याप्रमाणे मुस्लिम ईदची वाट पाहतात, त्याचप्रमाणे हिंदू होळीची वाट पाहतात. शुक्रवार वर्षातून ५२ वेळा येतो आणि होळी वर्षातून फक्त एकदाच येते, म्हणून ज्यांना रंगाची समस्या आहे त्यांनी घरीच बसावे.
पोलीस अधिकाऱ्याचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर सहमती दर्शवली तर अनेकांनी विरोध केला. यावरून विरोधकांनी बराच वाद निर्माण केला. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर सहमती दर्शविली. ते म्हणाले, पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. अनेकांना वाटते कि अधिकाऱ्या रागाने बोलत होता. मात्र, तसे नाहीये मुळात म्हणजे पोलीस अनुज चौधरी हे पैलवान असल्याने त्यांची भाषाच तशी आहे. त्यांनी जे आवाहन केल आहे ते योग्य आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
जुम्मासाठी होळी उत्सवात दोन तासांचा ब्रेक घ्या; दरभंगाच्या महापौरांचा अजब सल्ला
भारत-नेपाळ सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी करताना बांगलादेशी नागरिकाला अटक!
हसीना शेख यांची मालमत्ता आणि नातेवाईकांसह १२४ बँक खाती जप्त करण्याचे आदेश!
दरम्यान, समाजवादी पक्षाने यावर टीका केली. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमिक जमेई यांनी सीओ अनुज चौधरी यांच्यावर हल्लाबोल करताना सोशल मीडियावर लिहिले होते की ते सरकारची स्तुती करत आहेत. भाजपला खूश करण्यासाठी मुस्लिमांविरुद्ध त्यांनी विधान केल्याचे अमिक जमेई यांनी म्हटले.