राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असताना आता याचं अवकाळी पावसाने अचानक मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये हजेरी लावून सर्वांची तारांबळ उडवून दिली आहे. ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर आता पावसाने मुंबईत हजेरी लावून धांदल उडवून दिली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीचं दाणादाण उडवली पाहायला मिळाली आहे. अशातच मुंबईमधील जनजीवनही विस्कळीत झाल्याचे दिसले.
मुसळधार पावसामुळे मुंबई मेट्रो- १ ठप्प झाल्याची माहिती आहे. मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्यामुळे मेट्रो सेवा ठप्प झाली असून वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून स्थानकांवरचं अडकून पडले आहेत. दरम्यान, विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण दुसरीकडे वळवण्यात आले असून काही सेवांच्या वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रनवेही काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
पावसाचा फटका मध्य रेल्वेवरील वाहतुकीलाही बसल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेवरील मुलुंड ते ठाणे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे घराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
#DustStorm over Lower Parel. #MumbaiRains pic.twitter.com/eVBz2JUsrP
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) May 13, 2024
हे ही वाचा:
सुरक्षा दलाकडून गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त
“पाकिस्तानला बांगड्या घालायला लावतो”
‘तुम्ही ‘आप’ला मत दिल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही’
अनेक ठिकाणी पाऊस आणि वाऱ्यासह धुळीचं प्रचंड साम्राज्य बघायला मिळत आहे. धुळीमुळे काही ठिकाणी दृष्यमानता कमी झाल्याचं चित्र आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले आणि वारे वाहू लागले. शिवाय मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली. मुंबई उपनगरांत वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलुंड, भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे.