अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा होणार; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा होणार; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

सध्या मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यातच पावसामुळे १४ जुलै रोजीच्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाला रद्द कराव्या लागल्या. आता नव्या वेळापत्रकानुसार १८ व १९ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ह्यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, एमएससी इन फायनान्स विषयांच्या नऊ परीक्षा ह्या काळात घेतले जाणार आहेत. ह्या परीक्षासाठी पूर्वीचे केंद्र निश्चित केलेले आहेत, असे विद्यापीठाने स्पष्ट केलेले आहे.

कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I, फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट, एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स आणि सीएसआर, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजसाठी १८ जुलै (सोमवार) रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी या विषयांची परीक्षा १९ जुलै (मंगळवार) घेतली जाणार आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

‘मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु’

मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर MPSC च्या ४०० जागा वाढणार

या परीक्षेसंदर्भात समाज माध्यमात वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे संदेश फिरत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करावे अशी विद्यापीठाने विनंती केली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ किंवा आपल्या संबंधित महाविद्यालशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version