‘युनिव्हर्स बॉस’ने मानले मोदींचे आभार

‘युनिव्हर्स बॉस’ने मानले मोदींचे आभार

PORT OF SPAIN, TRINIDAD AND TOBAGO - AUGUST 14: Chris Gayle of the West Indies brings up his 50 during the third MyTeam11 ODI between the West Indies and India at the Queen's Park Oval on August 14, 2019 in Port of Spain, Trinidad And Tobago. (Photo by Ashley Allen/Getty Images)

एकीकडे कोरोनाने सारे जग त्रस्त असताना भारतीय बनावटीच्या लसी या अनेक देशांसाठी संजीवनी ठरत आहेत. भारताने ‘वॅक्सीन मैत्री’ निभावताना जगातील जवळपास सत्तर देशांना लस पुरवली आहे. या सर्वच देशातून भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बुधवारी वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटपटूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने जमैका या देशाला कोरोनावरची लस पुरवली म्हणून त्याने भारताचे आभार मानले आहेत. हा क्रिकेटपटू म्हणजे वेस्ट इंडिज संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल. ‘इंडिया इन जमैका’ या ट्विटर हॅन्डलने गेलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि ख्रिस गेलने स्वतः देखील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल

ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर

राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?

या व्हिडिओमध्ये गेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकातील भारतीय हाय कमिशनचे आभार मानताना दिसत आहे. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि भारताच्या जनतेचे मी आभार मानू इच्छितो. भारताने दिलेल्या वॅक्सीनबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.” असे गेल या व्हिडिओमधून म्हणाला आहे.

ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज असून त्याने आयपीएलमध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे. स्वतःच्या खेळीच्या जोरावर संघाला सामना जिंकून देण्याची ताकद असलेला हा खेळाडू आहे. ख्रिस गेलच्या या व्हिडिओनंतर केंद्रीय शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी यांनी ख्रिस गेलच्या खेळाचे कौतुक करत आभार मानले.

Exit mobile version