भारताच्या अस्तित्वातच एकता

भारताच्या अस्तित्वात एकता आहे आपण पुढे जात असताना जग भारताकडून शिकू शकेल, असं संघ प्रमुख माेहन भागवत नागपूरमध्ये म्हणाले

भारताच्या अस्तित्वातच एकता

“आम्ही वेगळे दिसू शकतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो, पण आपल्या अस्तित्वात एकता आहे. भारताच्या अस्तित्वात एकता आहे आपण पुढे जात असताना जग भारताकडून शिकू शकेल, असं संघ प्रमुख माेहन भागवत म्हणाले. नागपूरमध्ये आयाेजित ‘उत्तीष्ठ भारत’ कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, भारताला माेठे बनवायचे असेल तर आपल्याला घाबरणे थांबवले पाहिजे, घाबरणे साेडले तरच भारत अखंड हाेईल . आपण अहिंसेचे उपासक आहाेत पण दुर्बलतेचे नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं

‘भारत@ २०४७’माय व्हिजन माय ऍक्शन ‘ या विषयावर ते म्हणाले, संपूर्ण जग विविधतेचे व्यवस्थापन करण्यासाठी भारताकडे पाहत आहे. विविधतेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्याची वेळ येते त्यावेळी भारत जगाचं लक्ष वेधून घेताे.. जग हे विरोधाभासांनी भरलेले आहे, पण त्याचं व्यवस्थापन फक्त भारतच करू शकतो.

हे ही वाचा:

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

जातीभेद निर्माण करण्यासाठी भेद निर्माण केला
विनाकारण आमच्यात भेद निर्माण करण्यासाठी जातीपातीची दरी निर्माण करण्यात आली, असं संघप्रमुख म्हणाले.
“अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, ज्या आम्हाला कधीही सांगितल्या गेल्या नाहीत किंवा नीट शिकवल्या गेल्या नाहीत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी संस्कृत व्याकरणाचा जन्म झाला ते भारतात नाही. आम्ही कधी प्रश्न विचारला का? आम्ही आमचे ज्ञान आधीच विसरलो होतो, नंतर परकीय आक्रमकांनी आमच्या भूमीवर कब्जा केला, असे ते म्हणाले.

देशातील सर्व भाषा राष्ट्रभाषा
भाषा, पेहराव, संस्कृती यांमध्ये आपल्यात छोटे-मोठे भेद आहेत, पण या गोष्टींमध्ये आपण अडकू नये. ते म्हणाले, देशातील सर्व भाषा राष्ट्रभाषा आहेत, सर्व जातीधर्माचे लोक माझे आहेत, अशी आपुलकी हवी.

Exit mobile version