भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी हाय-व्होल्टेज भारत- पाकिस्तान क्रिकेटचा सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर मोठी गर्दी केलेली आहे. सामन्याचा फीव्हर सगळीकडे पहायला मिळत असताना सोशल मीडियावरही या सामन्यासंबंधीच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.
भारत- पाक सामना रंगलेला असताना लोक भारताला सपोर्ट करणाऱ्या आणि पाकिस्तानला ट्रोल करणाऱ्या पोस्ट करत आहेत. यामध्ये स्विगी – झोमॅटो आणि इतर कंपन्याही मागे राहिलेल्या नाहीत. झोमॅटोने आपल्या एक्स हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांचा बॅनर दिसत आहे. या बॅनरवर लिहिलंय, “प्रिय पाकिस्तान, तुम्हाला बर्गर- पिझ्झा हवा असेल तर तो मिळेल; मात्र वर्ल्डकप मिळणार नाही.”
Indiaaa-India ka time hai 🇮🇳 #MatchHoTohZomato #INDvsPAK pic.twitter.com/2GzBZf1XIs
— zomato (@zomato) October 14, 2023
दुसरीकडे स्विगीनेही आपल्या अनोख्या शैलीत या सामन्याबद्दल लिहिले आहे. स्विगीने एक्स अकाउंटवरुन बऱ्याच पोस्ट करत पाकिस्तानला ट्रोल केलं आहे. “या सामन्या दरम्यान पाऊस तर पडेल, मात्र तो केवळ शेजाऱ्यांच्या अश्रूंचा असेल” असं स्विगीने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
yeah there will be rain but in the form of tears(padosiyon ke)🤭 https://t.co/rcTigKySiA
— Swiggy Instamart (@SwiggyInstamart) October 13, 2023
हे ही वाचा:
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक
इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा
गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना
टिंडरनेही मजेशीर पोस्ट करत “आजच्या दिवस केवळ ग्रीन फ्लॅग्स पासून दूर रहा” असा मजेशीर सल्ला दिला आहे. तर, ब्लिंकइटने देखील “भारत जिंकावा असं वाटत असेल तर रिट्विट करा, अन् पाकिस्तान हरावा वाटत असेल तर रिप्लाय करा” अशी पोस्ट करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
RT if you want India to win REPLY if you want Pakistan to lose
— Blinkit (@letsblinkit) October 14, 2023
the only day we’ll ask you to stay away from green flags 😌 #INDvsPAK
— Tinder India (@Tinder_India) October 14, 2023