राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!

माजी आयएएस अधिकाऱ्याने दिली भेट

राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!

अयोध्येत प्रभू राम मंदिरात रामललासोबत ठेवलेले ‘सुवर्ण रामायण’ही आता भाविकांना पाहता येणार आहे.धातूपासून बनवलेल्या या ग्रंथाची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राम मंदिरात आता भक्तांना अनोखे सुवर्ण रामायण पाहता येणार आहे. या रामायणाची गर्भगृहात विधिवत स्थापना करण्यात आली आहे.सोन्याने मढलेली ही रामायण पुस्तिका मध्य प्रदेश केडरचे माजी आयएएस सुब्रमण्यम लक्ष्मीनारायणन आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी राम मंदिर ट्रस्टला भेट दिली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी(९ एप्रिल) या रामायणाच्या स्थापनेवेळी लक्ष्मी नारायण आपल्या पत्नीसह उपस्थित होते.

हे ही वाचा:

काँग्रेस राजवटीत लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी संघर्ष मात्र मोदी सरकारच्या काळात ८८ हजार कोटी रुपयांची निर्यात

भारतात यंदा मान्सून राहणार सामान्य

१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!

‘इस्रायलला शस्त्रे पाठवणे ब्रिटन थांबवणार नाही’

याची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध वुम्मीदी बंगारू ज्वेलर्सने केली आहे.सुवर्ण रामायणाला गर्भगृहातील रामललाच्या मूर्तीपासून अवघ्या १५ फूट अंतरावर दगडी पीठावर ठेवण्यात आले आहे.यावेळी राम मंदिर उभारणीचे प्रभारी गोपाल राव, पुजारी प्रेमचंद त्रिपाठी आदी उपस्थित होते.

सुवर्ण रामायणाचे वैशिष्ट्य
या विशेष प्रतिकृतीचे प्रत्येक पान तांब्यापासून बनवलेले असून त्याचा आकार १४ बाय १२ इंच आहे. ज्यावर राम चरित मानसातील श्लोक कोरलेले आहेत. १०,९०२ श्लोकांच्या या महाकाव्याच्या प्रत्येक पानावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा आहे. सोनेरी प्रतिकृतीमध्ये अंदाजे ४८०-५०० पृष्ठे आहेत आणि ती १५१ किलो तांबे आणि ३-४ किलो सोन्यापासून बनलेली आहे. प्रत्येक पान तीन किलो वजनाचे आहे. धातूपासून बनवलेल्या या रामायणाचे वजन दीड क्विंटलपेक्षा जास्त आहे.त्यामुळे प्रभू रामांच्या दर्शनासह सुवर्ण रामायण ग्रंथही भाविकांना पाहता येणार आहे.

Exit mobile version