31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषअबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

एनएचएआय आपले कर्ज कमी करण्यात ठरतेय यशस्वी

Google News Follow

Related

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांचे पूर्णपणे वेगळे विचार असतात. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी आता मास्टर स्ट्रोक मारला आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्णयामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ( NHAI ) एकाच वेळी १,२०० कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

वास्तविक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चालू आर्थिक वर्षात ५६,००० कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले आहे. त्यामुळे १२०० कोटी रुपयांचे व्याज वाचले आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्राधिकरणाचे एकूण कर्ज ३.३५ लाख कोटी रुपये होते. २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस ते सुमारे २.७६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. प्राधिकरण आपल्या कर्जाचा बोजा कमी करण्यात यशस्वी होत आहे.

प्रीपे म्हणजे काय?

कर्ज मुदतीपूर्वी देण्याच्या प्रक्रियेस प्रीपे म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कार लोन घेतले असेल आणि ते ५ वर्षांत फेडावे लागेल, परंतु तुम्ही संपूर्ण कर्जाची ३ वर्षांत परतफेड केली असेल, तर याला प्रीपेमेंट म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे व्याजाच्या रक्कमेत मोठी बचत होते.

एनएचएआयला इन्फ्रॉस्ट्रचर इनव्हेसमेंट फंडाकडून ( InvIT) मिळालेले १५,७०० कोटी रुपये कर्जाच्या मुदतपूर्वी परतफेडीसाठी वापरले आहे. तसेच राष्ट्रीय लघू बचत निधी ३०,००० कोटी रुपये, भारतीय स्टेट बँकेचे १०,००० कोटी असे ४०,००० कोटी रुपयाचे कर्ज फेडले आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्ज कमी होत असल्यामुळे या संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कर्ज कमी झाल्यामुळे व्याजावरील खर्चही कमी होईल. हा वाचलेला खर्च नवीन महामार्ग प्रकल्पांसाठी वापरता येणार आहे. इन्फ्रॉस्ट्रक्चर इनव्हेसमेंट फंड एक गुंतवणूक ट्रस्ट आहे. त्याकडून प्राधिकरणाला निधी मिळाला आहे. नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड आणि एसबीआयच्या कर्जाची परतफेड करून प्राधिकरणाला उच्च व्याजदरापासून दिलासा मिळाला आहे.

प्राधिकरणाची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल. नवीन महामार्गांच्या बांधकामामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्राधिकरणाचे कर्ज कमी होणे ही देशासाठी चांगली बातमी आहे.

हे ही वाचा : 

गुजरातमध्ये ‘आप’ नेता बनला अन्नामलाई, स्वतःला मारले पट्ट्याचे फटके

पुराव्यांशी छेडछाड कराल तर याद राखा, म्हणत आसाराम बापूला ‘वैद्यकीय जामीन’

चष्म्यात लावलेल्या कॅमेरातून राम मंदिराचे काढत होता फोटो, पोलिसांनी केली अटक!

तस्करीची झाली मस्करी, शर्टच्या बटणांमध्ये लपवलेले सोने पकडले!

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा