मदरशात झाडूच्या सहाय्याने एके ४७ बनवण्याचे प्रशिक्षण!

केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांचा आरोप

मदरशात झाडूच्या सहाय्याने एके ४७ बनवण्याचे प्रशिक्षण!

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बंडी संजय कुमार यांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) मदरशांच्या संदर्भात मोठे विधान केले आहे. मदरशांमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असून ते राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मदरशांमधील विद्यार्थ्यांना झाडूच्या मदतीने एके-४७ रायफल बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे ते म्हणाले आहेत. तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील श्री विद्यारण्य आवास विद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बंडी संजय कुमार बोलत होते.

मंत्री बंडी संजय कुमार म्हणाले, काही मदरसे विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवत आहेत आणि सरकार या संस्थांना निधी देऊन चुकीच्या कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत, सरकारच्या निधीवरून त्यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, हैदराबाद, सिद्धीपेठ किंवा करीमनगर सारख्या ठिकाणच्या काही मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना १० ते १०० रुपयांची किरकोळ रक्कम दिली जाते. पण या मदरशांमध्ये काय चालले आहे?, जगभरातील अनेक गुन्हेगार चौकशीदरम्यान आपल्या चुकीच्या कृत्यांची माहिती देताना, ते अशाच मदरशांकडे बोट दाखवतात.

ते पुढे म्हणाले, अमेरिका, मुंबई किंवा लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट हो, ते अनेकदा मदरशांशी संबंधित असतात. सरकारने यावर लक्ष देण्याऐवजी, नवीन तंत्रज्ञान आणि शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्याच्या नावाखाली या मदरशांना निधी पुरवते.

हे ही वाचा : 

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत समितीकडे १ कोटी सूचना

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘दीड वर्षात माओवाद्यांचा नायनाट करू, आत्मसमर्पणाचे आवाहन’

आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा

महागाई कुठे आहे? आयफोन खरेदीसाठी लागल्या रांगा

 

Exit mobile version