29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषकेंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे होता पदभार

Google News Follow

Related

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची सोमवारी(२४ जून) राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल सभागृहात ही जबाबदारी सांभाळत होते, मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज (२४ जून) पासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभागृह नेते असल्याने पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सदस्यत्वाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर, इतर केंद्रीय मंत्र्यांसह २८० खासदार शपथ घेणार असून मंगळवारी (२५ जून) २६४ नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत.

हे ही वाचा:

‘नव्या संकल्पासह काम करेल १८ वी लोकसभा’

भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!

दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!

नेमबाजीतला गोल्डन बॉय अवनीश पाटील

दरम्यान, संसदेच्या पहिल्या अधिवेशनात गोंगाट होण्याची शक्यता आहे. कारण अनेक मुद्यांवरून विरोधक सरकारला घेणाऱ्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामध्ये नीट पेपर लीक, रेल्वे अपघात अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. संसदेचे पहिले अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा