राज्यातून कोरोना निर्बंध हटणार?

राज्यातून कोरोना निर्बंध हटणार?

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे सावट होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील नियंत्रणात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिण्यात आले आहे.

आपत्ती निवारण प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे नियम घालून देण्यात आले होते, ते हटवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे, असे पत्रात म्हटले आहे. मास्कचा वापर बंधनकारक ठेवायचा की नाही हा निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

राज्यांना पत्र पाठवण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य विभागाकडून देशातील एकूण कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्य़ात आला आहे, त्यानंतर केंद्रीय गृह सचिवांकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासीत प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जे आदेश जारी केले आहेत, त्याचा कालावधी संपल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने कोरोना संदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट येऊ नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळेवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे.

हे ही वाचा:

‘हा’ दिग्गज अभिनेता साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका

हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

गेल्या सात आठवड्यांमध्ये आकडेवारीनुसार कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांना पत्र देखील पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version