कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातल्या ईश्वरमंगला मधील अमरगिरी येथे भारत मात्याचे मंदिर बांधण्यात आले आहे. गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याहस्ते या मंदिराचे उदघाटन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री शाह पुत्तूर शहरातील मध्यवर्ती सुपारी अरेकनट आणि कोको विपणन मार्केटिंग आणि प्रक्रिया सहकारी लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकात आले होते.
धर्मश्री प्रतिष्ठान ट्रस्टने तीन कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधले आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे असलेल्या भारत माता मंदिरानंतर हे देशातील दुसरे मंदिर आहे. फाउंडेशनचे प्रशासकीय परोपकारी अच्युत मुडेथैया यांनी सांगितले की, ट्रस्टच्या २. ५. एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. भारतमातेच्या महान योद्धांप्रती लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा मंदिराचा उद्देश आहे.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
मंदिरात भारतमातेची सहा फूट उंचीची मूर्ती आहे आणि सैनिक आणि शेतकऱ्यांची तीन फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. तत्पूर्वी शाह यांनी हनुमागिरी येथील श्री पंचमुखी अंजनेय मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील खासदार होते.