दिल्लीतील काश्मिरी गेट आयएसबीटी येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा दावा करत तीन तरुणांनी दिल्ली येथील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासले आणि महाराणा प्रताप यांचे पोस्टर लावले. अमित राठोड नावाच्या व्यक्तीने या कृत्याचे समर्थन करत म्हटले की, “भारत महाराणा प्रताप यांचा अपमान सहन करणार नाही. पोलिस प्रशासन आणि दिल्ली सरकार आयएसबीटी काश्मिरी गेट येथे घडलेली घटना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. जे यात दोषी आहेत त्यांना अटक करावी, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.”
विजय नावाच्या आणखी एका निदर्शकाने सांगितले की, ते ऐतिहासिक व्यक्तींच्या नावांचे फलक लावत आहेत. “आम्ही अकबर, बाबर आणि हुमायून सारख्या आक्रमकांचे फलक सतत काढून टाकत आहोत आणि आम्ही सरकारला डोळे उघडून निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रश्न असा आहे की, हे फक्त आपणच का करत आहोत? समाजातील इतर लोक कुठे आहेत?”
महाराणा प्रताप यांचा फोटो साइनबोर्डवर लावल्यानंतर त्यांनी जय भवानी, जय महाराणा अशा घोषणा दिल्या. त्यांनी म्हटले की, भारत महाराणा प्रताप यांचा अपमान सहन करणार नाही. आयएसबीटी आंतरराष्ट्रीय बस टर्मिनलवरील महाराणा प्रताप यांच्या अष्टधातू पुतळ्याशी ज्या प्रकारे छेडछाड करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना सांगू इच्छितो की, ते म्हणत आहेत की पुतळा माकडांनी तोडला आहे, पण आम्हाला फसवू नका. महाराणा प्रताप यांच्या अष्टधातू पुतळ्याला आदराने त्याच्या मूळ जागी परत ठेवा. अन्यथा, इशारा असा आहे की आम्ही एकही नाव सोडणार नाही आणि त्यांना पुसून टाकू.
#WATCH | Delhi | Unidentified men defaced the signboard of 'Akbar road' yesterday claiming that the Maharana Pratap's statue at Delhi's Kashmere Gate ISBT was vandalised pic.twitter.com/8DtTlfyWMg
— ANI (@ANI) March 20, 2025
हे ही वाचा:
नागपूर हिंसाचार प्रकरणाचा मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
दिशा सालियन हत्या प्रकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणार?
युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता
नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
साइनबोर्डवर काळे फासून महाराणा प्रताप यांचा फोटो लावणारे हे हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा अमित राठोड हा त्याच्या इंस्टाग्राम पेजवर या गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक असल्याचा दावा करत आहे.