मुंबईत सध्या उशिरा पर्यंत गरबा खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता आनंदातील उत्साह पुसला जाऊन शोककळा पसरण्याच्या घटना मुंबई व लगतच्या परिसरात वाढत चालल्या आहेत. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा बिल्डिंगच्या परिसरात कुटुंबासोबत गरबा खेळत होता. मनीष जैन याला गरबा खेळता-खेळता अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन आणि भाऊ यांनी मनीषला विरारच्या संजीवनी रुग्णालयात भरती करण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने नरपत जैन (६५) यांचा ही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अशीच अजून एक घटना विरार मध्ये घडली आहे, ३५ वर्षीय तरुणांचा राहत्या परिसरात गरबा खेळत असताना मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या निधनाच्या धक्क्याने त्यांच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. तर मुलुंडमध्ये ही गरबा खेळताना आणखी एका तरूनचाही मृत्यू ओढवला आहे.
अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार
पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी
जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या
मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त
अजून, एक धक्कादायक घटना डोंबिवली येथे तरुणाबाबत घडली आहे. २७ वर्षीय तरुण वृषभ भानुशाली हा आई-वडीलांसोबत वास्तव्यास होता. मात्र मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेरणा रास दांडिया’ खेळण्यासाठी गेला होता. गरबा खेळता-खेळता छातीत दुखू लागले. असिडीतीमुळे छातीत दुखत असेल म्हणून त्याला थंड पेय पिण्यास दिले. मात्र ते पेय प्यायल्यामुळे आणखी जास्त छातीत दुखू लागले. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू ने गाठले होते. वृषभ हा बोरिवली येथील खाजगी कंपनीत उच्चपदावर कार्यरत होता.