आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

मुंबईतील सीप्झ ते कफ परेड भुयारी मेट्रो- ३ हा प्रकल्प पुढील चार वर्षे तरी ताटकळणार आहे. पर्यावरणाच्या कारणामुळे महाविकास आघाडी सरकारने आरे येथील कारशेडच्या जागेला मान्यता दिली नाही. मात्र अद्यापही कारशेडसाठी पर्यायी जागा निश्चित झालेली नाही, त्यामुळे या प्रकल्पाला अनिश्चित काळासाठी विलंब होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने ‘मिरर’शी बोलताना सांगितले.

सुरुवातीला दिलेल्या मुदतीनुसार या प्रकल्पाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२१ आणि प्रकल्पाचा दुसरा टप्पा बीकेसी ते कफ परेड हा जुलै २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, पण कारशेडच नसेल तर मेट्रो सुरू करता येणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

मेट्रो- ३ च्या प्रकल्पासाठी कांजुरमार्ग किंवा गोरेगाव पहाडी येथील जागा निश्चित केली, तरी पुढील कार्यवाही होण्यासाठी साडेतीन ते चार वर्षे जातील, असे या प्रकल्पात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या प्रकल्पासाठी आतापर्यंत १८,४०० कोटी रुपये खर्च केले असून त्यातील जास्त निधी हा जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (जेआयसीए) दिला आहे. या प्रकल्पाचा खर्च २३,१३६ कोटी वरून ३३,४०६ कोटी इतका वाढला आहे.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

आधी मराठी शाळा तर वाचवा, मग ‘केंब्रिज’कडे वळा!

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

राज्य मंत्रिमंडळाने सुधारित खर्चाला मंजुरी दिल्यावरच जेआयसीए अजून निधी देऊ शकेल. महापालिकेचा शहरासाठीचा अर्थसंकल्प ३९,००० कोटी असून मेट्रो- ३ प्रकल्पाचा खर्च ३३,००० कोटीहून अधिक आहे. त्यामुळे आता प्रकल्पासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. जपानचे राजदूत सुझुकी सतोशी यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुधारित खर्चाला मंजुरी देण्याची विनंती केली होती. मंजुरी दिल्यावर जेआयसीएकडून पुढील निधी दिली जाईल. पत्राला अजूनही उत्तर आलेले नसून सुधारित खर्चाच्या मंजुरीवर लवकरच निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version