मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात ब्रिटिशकालीन भुयार आढळलं आहे. विशेष म्हणजे हे भुयार तब्बल १३० वर्ष जुनं असल्याची माहिती समोर आली आहे. हे भुयार नर्सिंग महाविद्यालय असून, भुयार सापडल्याने रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये कुतुहूल वाढले आहे.
बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी जे.जे. रुग्णालय परिसराची नियमित पाहणी करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण राठोड हे रुग्णालयाची पाहणी करत होते. यावेळी वैद्यकीय निवासी अधिकाऱ्यांना काही ठिकाणी संशयास्पद गोष्टी आढळल्या. त्यानंतर त्यांनी कुतूहल म्हणून अधिक खोलात जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी तिथलं झाकण काढले यावेळी तिथे त्यांना थोडी पोकळी असल्याचं जाणवलं. अधिक पाहणी केल्यावर तिथे असलेल्या भुयाराचा पत्ता लागला. पुढे आणखी पाहणी केली असता डी.एम पेटिट इमारत ते मुटलीबाई इमारत असे दोनशे मीटरच्या भुयाराचा शोध लागला आहे.
डॉ. अरुण राठोड यांनी या भुयाराची पुरातत्व विभागाला आणि स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. ही इमारत १३० वर्ष जुनी असल्याने हे भुयाराही १३० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल हे भुयार दोनशे मीटर लांब असून, हे भुयार आणखी मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार
उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं
‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा
दरम्यान, १९४५ साली सर जे.जे रुग्णालय हे रुग्णांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजही सुरु करण्यात आले होते. या रुग्णालयाच्या परिसरात अनेक ब्रिटिशकालीन इमारती आहेत.