रेल्वेत मागे राहिलेले सामान पुन्हा प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांमार्फत केला जातो. गेल्या सहा महिन्यात रेल्वेने असेच किमती सामान प्रवाशांना परत केले आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यात आरपीएफने हरवलेले सुमारे १ कोटी ८९ लाख रुपयांचे सामान प्रवाशांना परत करण्यात आले आहे. ६९८ प्रवाशांपैकी ३५४ प्रवाशांच्या सामानाची किंमत १ कोटी १७ लाख रुपये असून, एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रवाशांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
मुंबई विभागातील लोकलमध्ये विसरलेल्या आणि चोरलेल्या सामानाचा सर्वाधिक समावेश आहे. ऑपरेशन ‘मिशन अनामत’ अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने उत्तम अशी कामगिरी केली आहे. लोकल,मेल एक्सप्रेसच्या प्रवासा दरम्यान प्रवाशी आपले सामान घाई गडबडीत विसरतात. यामध्ये प्रवाशांचे हरवलेले सामान, मौल्यवान वस्तू, दागिने, मोबाईल, लॅपटॉप अशी किमती ऐवज असतो.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?
मुख्यमंत्र्यांच्या सत्यनारायण पूजेचा वाद न्यायालयात
हरवलेल्या सामानाची प्रवाशी आरपीएफ कडे तक्रार दाखल करतात.आरपीएफ दल रेल्वेच्या मालमतेचे रक्षण करण्याचे प्रमुख काम करते. सोबतच प्रवाशांना वेळोवेळी लागणाऱ्या मदतीसाठी आरपीएफ जवान तयार असतात. प्रवाशांचे हरवलेलं, मागे राहिलेले सामान, मोबाईल, लॅपटॉप, मौल्यवान वस्तू सोबतच दागिने व रोख रकमेचा सुद्धा समावेश असतो. २०२१ मध्ये आरपीएफने ६६६ प्रवाशांचे एक कोटी ६५ लाखांचे सामान परत केले आहे.