‘वादात सापडल्यानंतर सॅम पित्रोदांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली माहिती

‘वादात सापडल्यानंतर सॅम पित्रोदांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा’

दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील रहिवासी चीनी लोकांसारखे दिसतात, असे बेताल वक्तव्य करून काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा चांगल्याच वादात सापडले आहेत.सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर भाजपासह एनडीएमधील पक्षांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.काँग्रेसने तत्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

ट्विटरवर पोस्ट करत जयराम रमेश यांनी माहिती दिली की सॅम पित्रोदा यांनी स्वतःच्या इच्छेने या पदाचा राजीनामा दिला आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘सॅम पित्रोदा यांनी स्वत:च्या इच्छेने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका तारखा जाहीर’

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!

मुंबई पोलिसांच्या हाती पैशाचं घबाड, नाकाबंदी दरम्यान व्हॅनमधून सापडले ४ कोटी ७० लाख रुपये!

 

दरम्यान, जयराम रमेश यांनी सॅम पित्रोदा यांच्या राजीनाम्याचे कारण सांगितलेले नाही.मात्र, त्यांनी नुकत्याच केलेल्या वांशिक वक्तव्यामुळे राजीनामा दिल्याचे मानले जात आहे.सॅम पित्रोदा यांचे बुधवारी(८मे) एक विधान समोर आले होते.ज्यात त्यांनी होते की, पूर्व भारतीय हे चिनी लोकांसारखे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. पित्रोदांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापासून ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदी यांनी या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. पित्रोदांचं वक्तव्य भारतीय जनतेचा अपमान असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version