१९ वर्षांखालील महिलांच्या आशिया कपमध्ये भारत विजेता, त्रिशा चमकली!

बांगलादेशवर मात

१९ वर्षांखालील महिलांच्या आशिया कपमध्ये भारत विजेता, त्रिशा चमकली!

भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून अंडर-१९ महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या विजयात गोंगाडी त्रिशाची बॅट चमकली, तर गोलंदाजांनीही आपले कौशल्य दाखवले. भारताने बांगलादेश संघाचा पराभव करत ४१ धावांनी विजय मिळविला. दरम्यान, गोंगाडी त्रिशाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत भारताच्या महिला T२० विश्वचषक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून ११७ धावा केल्या आणि विजयासाठी ११८ धावांचं आव्हान दिले. त्रिशाशिवाय भारताकडून अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गोंगाडी त्रिशाने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. कर्णधार निक्की प्रसादलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मिथिला विनोदने शेवटी काही वेगवान खेळी खेळली आणि १२  चेंडूत १७ धावा केल्या.
हे ही वाचा : 
शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!
घाटकोपरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, गृहखाते फडणवीसांकडेच, शिंदेकडे नगरविकास खाते
महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल
दरम्यान, भारताने बांगलादेश संघाला विजयासाठी ११८ चे आव्हान दिले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना
बांगलादेशचा संपूर्ण संघ ७६ धावांवर बाद झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना ४१ धावांनी जिंकला. भारताकडून सोनम आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या आयुषी शुक्लाने १७ धावांत तीन बळी घेतले. विशेष म्हणजे,  १५ दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेश पुरुष संघ अंतिम फेरीत भिडले होते. यावेळी बांगलादेशने भारताचा पराभव करत विजय मिळविला होता. मात्र, भारताच्या महिला संघाने ती चूक केली नाही आणि बांगलादेशला पाणी पाजत जेतेपदावर नाव कोरले.
Exit mobile version