पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त

हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाची कारवाई

पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त

कोल्हापुरातील पन्हाळा गडाच्या शेजारी असलेल्या पावनगडावरील बेकादेशीर मदरसा पोलिसांनी जमीनदोस्त केला आहे. पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या मदरशामध्ये बिहार आणि पश्चिम बंगालचे ४५ विधार्थी शिकत असल्याची माहिती आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावनगडावर गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या मदरसे उभारण्यात आले होते. पावनगडावरील हा मदरसा हटवण्यात यावा, अशी मागणी इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आणि हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती.मात्र, तेव्हा मदरशावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर प्रशासनाने दखल घेत पावनगडावरील अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता या कारवाईला सुरू करण्यात झाली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली.

किल्ले पावनगडावरील अतिक्रमण करून उभारण्यात आलेला मदरसा जमीनदोस्त करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहेत. कारवाईबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गडावर जाणारे सर्व मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

बंगाल रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्येंना अटक!

पवारांना सुटेना ‘४०० पार…’ चे गणित

प्रभू राम माझ्या रक्तात!

दाऊदच्या स्थावर मालमत्तेची खरेदी केली दिल्लीच्या अभय श्रीवास्तव यांनी

दरम्यान, पावनगडावरील हा अनधिकृत मदरसा १९८९ पासून होता . त्यानंतर या मदरशावर कारवाई झाल्यानंतर हा मदरसा तीन ते चार वर्षे बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा मदरसा चालू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मदरशामध्ये उत्तरप्रदेश ,पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मुले शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या मदरशातील मुलांना हलवण्यात आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पन्हाळ गडाच्याशेजारी चार किलोमीटर अंतरावर हा पावनगड किल्ला आहे.विशेष म्हणजे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. शत्रूला चकवा देण्यासाठी हा गड बांधण्यात आला.अनेक इतिहासाचे दाखले देखील या गडावर मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व आहे.

Exit mobile version