पुण्यातील खेडकर कुटुंबियांच्या बंगल्याबाहेरील अतिक्रमण अखेर हटवण्यात आले आहे. पुणे पालिकेच्या नोटीसनंतर अतिक्रमण काढण्यात आले आहे. खेडकर कुटुंबीयांनी स्वतः हे बांधकाम हटवले आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची अनेक कारनामे समोर येत असताना त्यांच्या पुण्यातील ‘ओम दीप’ बंगल्याच्या बाहेर अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर आले होते. बंगल्याबाहेरील फुटपाथवर झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी पुणे पालिकेने खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावली होती. ७ दिवसांच्या आता अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या नोटीसमध्ये म्हटले होते. अखेर स्वतः खेडकर कुटुंबीयांनी आज बंगल्याबाहेरील अतिक्रमण हटवले आहे. चार कामगारांकडून अतिक्रमण काढण्यात आले आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्यासह कुटुंबियांच्या अडचणीतही वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर अद्याप फरार आहेत. दोघांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा:
दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कोणाकडे राहायला होता याची चौकशी होणार
मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?
महायुती सरकारची नवी योजना; विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १० हजार