मुंबईच्या धारावीमधील मेहबुब ए सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात झाली आहे. मशिदीच्या मेहबूब सुबानिया ट्रस्टने बाधकाम काढण्याची जबाबदारी घेतली आहे. मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अखेर ट्रस्टने पुढाकार घेत अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील याबाबत ट्वीटकरत माहिती दिली.
धारावीच्या परिसरात मेहबुब ए सुभानिया ही मशिद असून या मशिदीचा काही भाग अवैध असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेचे पथक हे अनधिकृत भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांना अडवत पथकाच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या देखील त्यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर वाद चिघळला, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून वारंवार आवाज उठवला.
अवैध बांधकाम असेल तर कारवाई होणारच, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवातीलाच स्पष्ट केले होते. यानंतर स्वतः मशिदीच्या ट्रस्टने अवैध बांधकाम काढण्याचे लेखी निवेदन दिले. त्यानंतर आज ट्रस्टने मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा :
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’
सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली