इस्रायल आणि हमासदरम्यान दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १० जून रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युद्ध समाप्त करण्याच्या उद्देशाने युद्धविराम योजनेचे समर्थन केले आणि त्यांच्या पहिल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव अमेरिकेने सादर केला होता, जो १४-० ने संमत झाला. मतदानावेळी रशिया तिथे उपस्थित नव्हता.
इस्रायलने हा प्रस्ताव मान्य केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. तसेच, हमासनेही हा प्रस्ताव स्वीकारावा, असे आवाहन अमेरिकेने केले. इस्रायल आणि हमास कोणत्याही अटीशर्तींविना या प्रस्तावातील अटी पूर्णपणे लागू करेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
शीख समुदायाबाबत कामरान अकमलने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हरभजन सिंगने घेतला समाचार
आस्था जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला
‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’
रेल्वे पोलीस विभागाला ४०० टक्क्याचे अमिष दाखवून निविदा केली मंजूर
हमासने प्रस्तावाचे केले स्वागत
हमासने सोमवारी या प्रस्तावाचे स्वागत केले. या प्रस्तावातील सिद्धांत लागू करण्यासाठी मध्यस्थांच्या साथीने सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. हमासच्या मागण्यांनुसार असलेल्या या प्रस्तावातील तरतुदी लागू करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारीही हमासने दर्शवली आहे. सुरक्षा परिषदेच्या या गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम, कैद्यांची अदलाबदल, पुनर्निर्माण आणि आवश्यक मदत देण्यासहित प्रस्तावात समाविष्ट असलेल्या अनेक तरतुदींचे हमासने स्वागत केले आहे.
७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीत आक्रमण केले होते. इस्रायलच्या या हल्ल्यात आतापर्यंत ३६ हजार ७००हून अधिक पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून ८० हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या युद्धामुळे ८० टक्के लोक विस्थापित झाले असून शेकडो हजारो लोक भुकेने व्याकूळ आहेत.