आंतरराष्ट्रीय शांती सेनेने लेबॅनॉन स्थित, शांती सेनेचा भाग असलेल्या भारतीय सैन्याच्या ९ डोग्रा इन्फन्ट्री ग्रुपला मानाच्या ‘हेड ऑफ मिशन ॲंड फोर्स कमांडर युनिट ॲप्रिसिएशन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या इन्फन्ट्रीला लेबॅनॉनमधल्या कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शांतिसेेनेत त्यांनी अतुलनीय काम केले आहे. या पुरस्काराची माहिती दक्षिण लेबॅनॉनमधल्या भारतीय दूतावासाने दिली आहे.
हे ही वाचा:
रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात
युएनमध्ये भारताची चकली डिप्लोमसी
शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये
लेबॅनॉनमधील शांती सेनेची मोहिम १९७८ पासून चालू आहे. इस्रायलने लेबॅनॉन सोडावा याची दक्षता घेण्यासाठी ही मोहिम चालू करण्यात आली होती. सध्या सुमारे ४५ देशांमधून एकूण १०,००० सैनिक लेबॅनॉनमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ७६२ सैनिक भारतीय आहेत. या शांती सेनेत इंडोनेशियाच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. सुमारे १२०० सैनिकांसह, इंडोनेशियन सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे.
जगात अशांत ठिकाणी पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांती सेना तैनात केली जाते. या सेनेत विविध देशांच्या सैन्यातील सैनिकांचा समावेश असतो. काही वेळेला एखाद्या ठिकाणच्या सुरक्षेसाठी देखील शांती सेना तैनात केली जाते. सध्या जगात १३ ठिकाणी शांती सेनेचे ऑपरेशन चालू आहे.