गाझामधील युद्धबंदीचा संयुक्त राष्ट्रांचा ठराव; इस्रायलची अमेरिकेवर टीका

अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर न केल्याने टीका

गाझामधील युद्धबंदीचा संयुक्त राष्ट्रांचा ठराव; इस्रायलची अमेरिकेवर टीका

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धानंतर पहिल्यांदाच सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने गाझामध्ये तत्काळ युद्धबंदीची हाक दिली. मात्र इस्रायलचा प्रमुख सहकारी देश असणाऱ्या अमेरिकेने या ठरावापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. इस्रायलने अमेरिकेच्या या कृतीचा निषेध करत ‘अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रांत त्याच्या धोरणालाच मूठमाती दिली,’ अशा शब्दांत टीका केली.

‘ओलिसांच्या सुटकेसाठी युद्धबंदीच्या ठरावाची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेने पाठिंबा दिला होता. चीन आणि रशियाने या ठरावाला अंशतः नकाराधिकाराचा वापर केला कारण ओलिसांच्या सुटकेशी संबंधित युद्धबंदीला त्यांचा विरोध आहे. मात्र ओलिसांच्या सुटकेशी संबंध नसणाऱ्या या ठरावाला रशिया आणि चीनने अल्जेरिया आणि अन्य राष्ट्रांच्या सोबतीने आज पाठिंबा दिला. मात्र, दुःखदायक बाब म्हणजे ओलिसांच्या सुटकेसाठी युद्धबंदीची मागणी करणाऱ्या ठरावासाठी अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर केला नाही,’ अशी टीका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली.

‘युद्धाला सुरुवात झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत सुरक्षा समितीमध्ये घेतलेल्या भूमिकेपासून हे स्पष्टपणे फारकत घेणे झाले,’ असेही ते म्हणाले. ‘आजच्या ठरावामुळे ओलिसांची सुटका न करता इस्रायलवर युद्धबंदीचा आंतरराष्ट्रीय दबाव आणता येईल, अशी आशा हमासला वाटू लागली आहे. त्यामुळे आमचे युद्ध आणि ओलिसांच्या सुटकेच्या प्रयत्नांना दोघांनाही खीळ बसली आहे,’ असे नेतान्याहू म्हणाले.

हे ही वाचा:

विराट कोहलीचे टी-२० क्रिकेटमधील १०० वे अर्धशतक

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

आरोग्य विभागासाठी अरविंद केजरीवालांनी ईडीच्या कोठडीतून काढला दुसरा आदेश

दक्षिण गाझामधील राफा शहरातील इस्रायलच्या लष्करी मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये इस्रायलचे शिष्टमंडळ पाठवण्याची कोणतीही योजना नाही, असेही नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. मात्र अमेरिका संयुक्त राष्ट्रांमध्ये अलिप्त राहण्याची भूमिका केल्यामुळे त्यांच्या धोरणात काही बदल होईल, हा दावा अमेरिकेने फेटाळून लावला. तसेच, इस्रायलने अमेरिकेसोबत होणाऱ्या बैठकीतून माघार घेतल्यामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. ‘हे अत्यंत निराशाजनक आहे.

राफामध्ये सुरू असलेल्या युद्धाला योग्य पर्यायाची चर्चा करण्यासंदर्भात वॉशिंग्टन डीसीमध्ये ही बैठक होणार होती. मात्र ते येणार नसल्याने आम्ही अत्यंत निराश झालो आहोत,’ असे व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी सांगितले.

Exit mobile version