राष्ट्रांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी संयुक्त राष्ट्र अध्यक्षांचे आवाहन

राष्ट्रांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी संयुक्त राष्ट्र अध्यक्षांचे आवाहन

यु.एन अध्यक्ष अन्टानिओ गुट्टेरस यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘क्लायमेट एम्बिशन समिट’च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सर्व राष्ट्रांनी पर्यावरणीय आणिबाणी जाहिर करावी असे आवाहन केले. 

पॅरिस कराराला पाच वर्षे पुर्ण झाली त्यानिमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व राष्ट्रे सध्याच्या मार्गावर कार्यरत राहिल्यास जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसच्या आत रोखण्याचे उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे. 

“जर आपल्या वर्तनात बदल केला नाही तर तापमानवाढ ३.० अंश सेल्सियसच्या पुढे जाऊन अटळ नुकसान होईल. त्यामुळेच मी सर्व राष्ट्रप्रमुखांना पर्यावरणीय आणिबाणी जाहिर करावी असे आवाहन करित आहे.” असे यु.एन. अध्यक्षांनी सांगितले. 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुएल मॅक्रोन हे या आभासी परिषदेत सहभागी होते. सुमारे ७५ देशांचे प्रमुख लवकरच पर्यावरणीय आणिबाणी जाहिर करण्याची शक्यता आहे. 

पॅरिस करारान्वये हरितवायू उत्सर्जन कमी करून तापमानवाढ २ अंश सेल्सियसवर रोखण्याचे निर्बंध आहेत. २०३० पर्यंत ही वाढ १.५ अंशावर रोखण्यासाठी वार्षिक कार्बन उत्सर्जन ७.६ टक्क्यांनी घटले पाहिजे असे मत यु.एनने व्यक्त केले. कार्बन उत्सर्जन कमी करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी जी-२० देशांनी घ्यावी असे मतही यु.एन. अध्यक्षांनी व्यक्त केले. 

कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे कार्बन उत्सर्जन घटले असे निरीक्षण यु.एनने नोंदवले. या काळाचा योग्य फायदा सर्वच राष्ट्रांनी करून घ्यावा आणि अर्थव्यवस्था पर्यावरणप्रेमी करावी असे मतही यु.एन. अध्यक्षांनी व्यक्त केले. 

Exit mobile version