25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषउमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता

उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता

महिलांच्या स्पर्धेत रेखा शिंदे, सुनंदा सातुले अव्वल

Google News Follow

Related

मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताने संतोष भरणकर आणि उबेद पटेल या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. परब फिटनेसचा भरणकर उपविजेता तर पटेलने तिसरे स्थान संपादले. महिलांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये सुनंदा सातुले तर शरीरसौष्ठवात रेखा शिंदेने बाजी मारली. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात रोहन भोसले आणि कौस्तुभ हडकर यांनी अव्वल स्थान पटकावले.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी स्टेजवर आठही गटविजेते उतरले तेव्हा सर्वांचा नजरा उबेद पटेल आणि संतोष भरणकरकडे वळल्या होत्या. या दोघांपुढे उंचीने कमी असलेला उमेश गुप्ता पीळदार वाटत होता. त्याची उंची, त्याच्या स्नायूंचे आकारमान निश्चित कमी होते, पण त्याच्या आखीवरेखीवपणा आणि पीळदारपणाने त्याला मुंबईच्या शरीरसौष्ठवाचे ऑस्कर जिंकून दिले. गेल्यावर्षी प्रथमच उमेश स्पर्धेत उतरला होता आणि तो टॉप थ्रीमध्ये बसला होता आणि त्याने यावेळी मुंबई शरीरसौष्ठवात आपली ताकद दाखवली. स्पर्धा जिल्हा पातळीवर असली तरी सव्वाशे पुरुष शरीरसौष्ठवपटूंसह फिजीक स्पोर्ट्सचे ५५ स्पर्धक आणि महिलांच्या गटातील २० पीळदार सौंदर्यवती असे एकंदर २०० स्पर्धकांनी मंचावर उतरून मुंबईची ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवली.

आज पुन्हा एकदा मुंबई उपनगर आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने शरीरसौष्ठवात आपलीच ताकद आहे आणि आपलीच चालते हे दाखवून दिले. शिवसेना सचिव आणि युवानेते सिद्धेश रामदास कदम यांच्या पाठबळामुळे अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात स्पर्धेचे दिमाखदार आणि देखणे आयोजन शरीरसौष्ठवप्रेमींना अनुभवता आले. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शिवसेना सचिव सिद्धेश कदम, शिवसेना समन्वयक नरेश म्हस्के, युवा नेते पुर्वेश सरनाईक शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, किट्टी फणसेका, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, राज्य शरीरसौष्ठवाचे कोषाध्यक्ष सुनिल शेगडे, अब्दुल मुकादम ,विजय झगडे आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.

कदम आणि संघटनेने पेलले शिवधनुष्य

मुंबई श्रीचे ग्लॅमर काही और आहे. स्पर्धेला स्पार्टन न्यूट्रिशन्सचे सहकार्य असले तरी स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतली आणि न भूतो न भविष्यति असे आयोजन करून दाखवले. स्पर्धेचे आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला लाजवेल असेच झाले. स्पर्धा दणक्यातच करायची, असे मनाशी ठरवत मुंबई श्रीची जबाबदारी सिद्धेश कदम यांनी स्वताच्या खांद्यावर घेतली आणि स्पर्धेच्या भव्यतेचे शिवधनुष्य संघटनेच्या मदतीने सहजपणे पेलले.

हे ही वाचा:

वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई उपनगरच्या हरमित सिंगला ‘महाराष्ट्र श्री’चा मान

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

महिलांमध्ये रेखा शिंदे, सुनंदा सातुले अव्वल

अलिकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणार्‍या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरु लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये रेखा शिंदे (हर्क्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना सुनंदा सातुलेला मागे टाकले. महिलांच्या शरीरसौष्ठवात सुनंदाला अपयश आले असले तरी तिने फिजीक स्पोर्ट्समध्ये अव्वल स्थान पटकावले. सुनंदाने दोन्ही गटात सहभाग घेतला होता.

स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्री स्पर्धेचा निकाल

५५ किलो वजनी गट : १. अक्षय गव्हाणे (पॉवर फिटनेस), २. ओमकार साईम (आर.एम.भट्ट जिम), ३. ओमकार भानसे (शिवाजी जिम), ४. रंजीत बंगेरा (आदीअंश जिम), ५. ओमकार देवळे (आर.एम.भट्ट जिम);
६० किलो : १. रोशन पाष्टे (बॉडी वर्कशॉप), २. रोहन भोसले (परब फिटनेस) ३. प्रशांत घोलम (एबीएस), ४. संजय जाधव (आर.एम.भट्ट जिम), ५. अनिश शिंदे (डीएनए ३६०);
६५ किलो : १.संकेत भरम (परब फिटनेस), २. अनिल जैसवाल (सोमय्या कॉलेज), ३. दर्शन सणस (जय भवानी), ४. कुलदीप रजपूत (हॅप्पी फिटनेस), ५. प्रतीक साळवी (माँसाहेब जिम);
७० किलो : १.उमेश गुप्ता (युजी फिटनेस), २. अमेय नेवगे (फिट अँड फाईन), ३.विलास घडवले (बॉडी वर्कशॉप), ४. तेजस भालेकर (फिटनेस हार्मनी), ५. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप); ७५ किलो : १.संतोष भरणकर (परब फिटनेस) २.विशाल धावडे (बालमित्र जिम), ३. गणेश उपाध्याय (बालमित्र जिम), ४. गणेश म्हाबदी (फ्लाईंग स्कॉड), ५. गणेश नगरकर (सर्वेश्वर फिटनेस); ८० किलो : १.अक्षय खोत (परब फिटनेस), २. विशाल गिजे (बालमित्र जिम), ३. राजेंद्र जाधव (कल्ट फिट जिम), ४. भूपेंद्र वर्मा (सावरकर जिम), ५. निखिल राणे (बॉडी वर्कशॉप) ; ८५ किलो : १. विजेंद्र ठसाळे (फिटनेस पॉईंट), २. अमित साटम (माँसाहेब जिम), ३. प्रणव खातू (यंग दत्ताराम), ४. अभिषेक लोंढे (हर्क्युलस फिटनेस), ५. अभिषेक माशेलकर (जे नाईन फिटनेस); ८५ किलोवरील : १. ऊबेद पटेल (विकी जिम), २. सुमित गुरव (स्टील बॉडी), ३. प्रथमेश तोडणकर (स्वामी समर्थ), ४. सागर पागडे (विजय जिम).
स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्री विजेता : उमेश गुप्ता
उपविजेता : संतोष भरणकर, द्वितीय उपविजेता : उबेद पटेल

मेन्स फिजिक्स स्पोर्ट्स अजिंक्यपद

१६५ सेमीपर्यंत : १. रोहन भोसले (परब फिटनेस ), २. अनिश शिंदे (डीएनए ३६०), ३. प्रतीक साळवी (माँसाहेब जिम), ४. आदित्य ढाणे (परब फिटनेस), ५. करण लाड (विराज फिटनेस).
१६५ सेमीवरील: १. कौस्तुभ हडकर (पीटर्स जिम), २. नितेश ठाकर (माँसाहेब जिम), ३. मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉप), ४. भूपेंद्र वर्मा (सावरकर जिम), ५. शंतनु सागर (फिगर फॅक्टरी).
फिजिक्स स्पोर्ट्स (महिला ): १. सुनंदा सातुले (डी फिटनेस), २. पुनम शिंदे -कोकणे (फिटनेस हाऊस), ३. ग्रंथालिया हांडे (फाइव स्टार) ४. निकिता पेडणेकर (जे नाईन), ५. प्रतिमा कांबळे (हर्क्युलस जिम).
महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे (हर्क्युलस फिटनेस), २.सुनंदा सातुले (बी फिटनेस), ३.शर्वरी गोडसे (फाईव्ह स्टार), ४.सपना भालेराव (आदीअंश जिम), ५. रसिका सावंत (बॉडी वर्कशॉप).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा