रशिया आणि युक्रेनमधील युद्धात एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला रशियामध्ये झाला आहे. मात्र, हा हल्ला कोणत्याही दहशतवाद्याने केला नसून युक्रेनने केला आहे. ९/११ च्या हल्ल्यात विमान इमारतीला धडकले होते. या हल्ल्यात युक्रेनचे ड्रोन रशियातील गगनचुंबी इमारतीला धडकले. युक्रेनियन ड्रोनने शहरातील सर्वात मोठ्या इमारतीला धडक दिल्याने रशियातील साराटोव्हमध्ये घबराट पसरली आहे. याशिवाय एंजेलिस शहरातील एका इमारतीलाही ड्रोन धडकले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत.
या प्रदेशाचे गव्हर्नर रोमन बुसार्गिन यांनी सांगितले की, या हल्ल्यात ३८ मजली व्होल्गा स्काय निवासी संकुलाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक ड्रोन इमारतीच्या मध्यभागी कोसळल्याचे दिसत आहे. ड्रोनच्या धडकेने आगीच्या ज्वाला भडकल्या. तसेच मोठा स्फोटही ऐकू आला. ड्रोनच्या धडकेचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात भीती स्पष्टपणे दिसत आहे. याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. सेराटोव्हशिवाय एंगेल्समधील एका इमारतीलाही ड्रोन धडकले आहे. तसेच आदल्या रात्री युक्रेनने सोडलेले २० ड्रोन रशियाने युक्रेनने पाडल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा :
भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी ४४ उमेदवारांची यादी जाहीर
हद्दच झाली! बांगलादेशातील पूर भारतामुळे आला म्हणत मंदिराची तोडफोड
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन
कन्नड आरोपी अभिनेत्याला तुरुंगात मिळतेय ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’, फोटो व्हायरल !
दरम्यान, एंगेल्स हे रशियन सैन्यासाठी अतिशय महत्त्वाचे शहर आहे. येथे स्ट्रॅटेजिक बॉम्बर आहे. २०२२ मध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने अनेकवेळा त्याला लक्ष्य केले आहे.