रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. या दरम्यान युक्रेनने रशियामध्ये घुसून रशियाचा अत्याधुनिक असे लढाऊ विमानच उद्ध्वस्त केले आहे.रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२पासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. या दरम्यान पहिल्यांदा युक्रेनने पहिल्यांदा रशियाच्या आत घुसून हवाई तळावरील रशियाच्या एसयू-५७ या लढाऊ जेटला लक्ष्य केले, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिली.
हवाई तळावर उभ्या असलेल्या रशियाच्या लढाऊ विमानावर हल्ला केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाच्या अंतर्गत भागात हल्ले करण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी त्यांची शस्त्रे वापरण्याची परवानगी युक्रेनला दिली आहे. त्यानंतर युक्रेनने रशियाच्या एसयू-५७ विमानाला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर झालेले नुकसान दाखवणारी उपग्रह छायाचित्रेही युक्रेनने जाहीर केली.
युक्रेनने रशियन जेटला कसे लक्ष्य करून उद्ध्वस्त केले आणि युक्रेनच्या लष्कराने कशी कारवाई केली, याची माहिती रविवारी देण्यात आली.
हे विमान अख्तुबिंस्क हवाईतळावर उभे होते. ही जागा युक्रेन आणि रशियाच्या लढाऊ दलाच्या मध्ये सीमेपासून ५८९ किमी दूर आहे. ७ जून रोजी एसयू-५७ हवाईतळावर उभे होते. मात्र ८ जूनला त्याच्यावर स्फोटाचे डाग आणि आगीचे झालेले नुकसान दिसत आहे. दोन्ही विमानांची छायाचित्रे युक्रेनने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
हे ही वाचा:
टेस्लाच्या एआय यंत्रणेत भारतीय वंशाच्या इंजिनियरचे योगदान!
ओडिशातील भाजपचे पहिले सरकार १०जूनऐवजी १२ जून रोजी शपथ घेणार!
‘पुन्हा भाजपचा जयजयकार केल्यास जमिनीत गाडून टाकू’
कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
रशियाकडूनही हल्ल्याला दुजोरा
रशियन युद्धसमर्थक ब्लॉगरनेही या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसयू-५७वर झालेल्ल्या हल्ल्याचे वृत्त खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा हल्ला ड्रोनद्वारे करण्यात आला. या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले, याची माहिती घेतली जात आहे. विमानाची दुरुस्ती केली जाईल की नाही, याची तपासणी केली जात आहे. जर विमानाची दुरुस्ती होऊ शकली नाही, तर या युद्धातील एसयू-५७चे हे पहिले नुकसान असेल.