लंडनमध्ये पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून १२० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. सुमारे तीन लाख पॅलिस्टनी समर्थकांनी सेंट्रल लंडनमध्ये मोर्चा काढला होता. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी दक्षिणपंथी समर्थकांनीही मोर्चा काढला. दोन्ही मोर्चे समोरासमोर उभे ठाकल्याने मोर्चांना हिंसक वळण लागले. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या मोर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर त्याची दुःखद आठवण म्हणून ब्रिटनमध्ये दरवर्षी युद्धविराम दिवस पाळला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून लंडनमध्ये पॅलिस्टिनी समर्थकांनी गाझामध्ये युद्धविरामाची मागणी केली. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पंतप्रधान सुनक यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चावर टीकाही केली आहे. या मोर्चादरम्यान ज्यूविरोधी आणि हमास समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचे समजते. गाझामध्ये युद्धाला तोंड फुटताच ब्रिटनमध्ये पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ अनेक मोर्चे निघाले आहेत. मात्र शनिवारी काढण्यात आलेला मोर्चा आतापर्यंतचा सर्वांत मोठा मोर्चा होता.
हेही वाचा..
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!
या मोर्चात हिंसाचार भडकू शकतो, याची कुणकुण लंडनच्या पोलिसांना आधीपासूनच होती, मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखण्यास नकार दिला. इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होईल, याची कल्पना पोलिसांनाही नव्हती, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर लंडनमध्ये तणावाचे वातावरण होते. पंतप्रधानांनी पोलिसांना या हिंसाचाराची गंभीरपणे चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.