पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या दोन भारतीय सैनिकांच्या चित्राची निर्यात करण्यास ब्रिटन सरकारने बंदी घातली आहे. अँग्लो-हंगेरियन चित्रकार फिलिप डी लास्लो यांनी हे चित्र काढले आहे. त्यांनी काढलेले चित्र देशाबाहेर नेले जाऊ नये म्हणून ब्रिटीश सरकारने ही तात्पुरती निर्यात बंदी घातली आहे. हे भव्य आणि संवेदनशील चित्र विकत घेण्यासाठी ब्रिटनमधील एका संस्थेला वेळ मिळावा यासाठी ब्रिटन सरकारने ही बंदी घातली आहे.
हे चित्र डे लास्लो यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी तयार केले होते आणि १९३७ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवले होते. एक्स्पोर्ट ऑफ आर्ट्स आणि ऑब्जेक्ट्स ऑफ कल्चरल इंटरेस्ट वरील आढावा समितीच्या सल्ल्यानुसार ब्रिटन सरकारने निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीने युद्धातील भारतीय योगदान आणि त्यात सहभागी व्यक्तींचा अभ्यास करण्याच्या निकषांवर आधारित शिफारस केली आहे.
फिलिप डी लास्लो हे २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या ब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रकारांपैकी एक होते. परंतु हे संवेदनशील चित्र अपूर्ण असल्यामुळे ते अधिक मूल्यवान आहे. या चित्रामध्ये दोन सामान्य ‘मध्यमवर्गीय’ शीख सैनिकांची अपवादात्मक झलक आहे असे समितीचे सदस्य पीटर बार्बर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबईत अतिरेकी शिरल्याचा फोन त्याने भावाला त्रास देण्यासाठी केला…
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे
आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा
…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!
अपूर्ण चित्राची किंमत ६.५ कोटी रुपये
या अपूर्ण काढलेल्या चित्राची किंमत सुमारे ६,५०,००० पौंड म्हणजे अंदाजे ६.५ कोटी रुपये आहे. या चित्रामध्ये घोडदळ अधिकारी रिसालदार जगत सिंग आणि रिसालदार मान सिंग आहेत. ते ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या एक्स्पिडिशनरी फोर्समध्ये कनिष्ठ कमांडर होते. या दोन्ही सैनिकांना युद्धादरम्यानच हौतात्म्यआले . पहिल्या महायुद्धात सक्रिय असलेल्या भारतीय सैनिकांचे चित्रण करणारे हे चित्र अत्यंत दुर्मिळ मानले जाते .
या आहेत आठवणी
पहिल्या महायुद्धात सुमारे १५ भारतीय सैनिक तैनात करण्यात आले होते. नोंदीनुसार लढण्यासाठी फ्रान्सला पाठवण्याच्या दोन महिने आधी चित्रामधील दोन सैनिक लँडमधील या चित्रकारासमोर बसले होते. या दोघांचे सुंदर चित्र या चित्रकाराला रेखाटायचे होते. २० व्या शतकातील एका प्रसिद्ध कलाकाराच्या चित्रकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याचे वर्णन केले गेले आहे. ब्रिटनच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून या चित्राकडे बघितले जाते कारण त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याचे सैन्य युरोपमध्ये लढण्यासाठी आले होते.