ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?

पोलिसांचा संशय

ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?

भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे हरयाणाचे प्रमुख आणि माजी आमदार नफे सिंग राठी यांच्या हत्येमागे ब्रिटनमधील गुंडांचा हात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

बहादूरगढ येथे २५ फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे हरयाणाचे प्रमुख नफेसिंह राठी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.या हल्ल्यात अन्य एक पक्ष कार्यकर्ताही मारला गेला होता.ह्युंदाई आय १० मधून आलेल्या मारेकऱ्यांनी राठी यांच्या एसयूव्ही गाडीवर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात अनेक सुरक्षारक्षकांनाही गंभीर जखमा झाल्या. सीआयए आणि एसटीएफ पथकाने तपासाला सुरुवात केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे झज्जरचे पोलिस अधीक्षक अर्पित जैन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

जरांगेंचा बोलविता धनी कोण? लवकरच षडयंत्र बाहेर काढणार

“जरांगेंची भाषा ही कार्यकर्त्याची नसून राजकीय पक्षाची भाषा”

शरीर कमावण्यासाठी तरुणाने चक्क गिळली नाणी, लोहचुंबक!

उत्तर प्रदेशमध्ये सपाचे चीफ व्हीप मनोज पांडे यांचा राजीनामा

दरम्यान, राठी यांच्या हत्येमागे ब्रिटनमधील गुंडांचा हात असण्याची शक्यता हरियाणा पोलिसांनी वर्तवली आहे.इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या एका गुंडाची पोलीस चौकशी करणार आहेत, जो ब्रिटनमधील गुंडांचा एक जवळचा साथीदार आहे.तत्पूर्वी, हरियाणातील टॉप गुंडांपैकी एक असलेल्या संदीप उर्फ ​​काला जाथेडी जो तिहार तुरुंगात कैद आहे याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत कैदी संदीपने नफे सिंह राठी याच्या हत्येत सहभाग नसल्याचे सांगितले.

नफे सिंग राठी यांच्या हत्येमागे ब्रिटनमधील कुख्यात गुंडाचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.कारण की, या गुंडाने यापूर्वीही अशा प्रकारचे राजकीय खून केल्याची माहिती आहे.त्यामुळे पोलिसांनी तसा संशय व्यक्त केला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version