28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेषयुजीसी, एनइटीची परीक्षाही लांबणीवर

युजीसी, एनइटीची परीक्षाही लांबणीवर

Google News Follow

Related

देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.  कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १५ दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीनं तारीख जाहीर केली जाईल, असं पोखरियाल म्हणाले.

देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (युजीसी) नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे (एनइटी) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, २०२० साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले होते.

हे ही वाचा:

अमेरिकेत सोळा वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

यवतमाळमध्ये बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

अरविंद केजरीवाल विलगीकरणात

दादरचे भाजी मार्केट बंद होणार?

नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. २ मे ते१७ मे दरम्यान नेटची परीक्षा होणार होती. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा