राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्धार केला आहे. ते आता थेट मैदानात उतरले आहेत. तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत.या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.मात्र ,उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन निशाणा साधला आहे.ते म्हणाले,सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय.सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय.उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे.
हे ही वाचा:
प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार
गावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख
विंडीजचा १४० किलोचा कॉर्नवॉल भारताला पडेल भारी?
उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका, असा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.