मुंबई काँग्रेसच्या वतीने काल (२० ऑगस्ट) मुंबईत राजीव गांधी सद्भावना दिवसानिम्मित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट प्रमुख शरद पवार यांना बोलावण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहायला मिळाले. यावरून त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला होता. ‘माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही’ अशी ठाम भूमिका त्यांची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळविले आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजप महाराष्ट्र ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणे घातलेल्याचा व्हिडिओ ट्विटकरत उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला का?, असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे.
हे ही वाचा :
लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरच्या शाळेला कारणे दाखवा नोटीस
अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू
मी सुन्न होतो : जेव्हा असतोइथे उद्रेकतिथे ‘शांतता’
काँग्रेसच्या कालच्या सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणं घातलं. या घटनेचा व्हिडिओ भाजपकडून ट्विटकरत म्हटले की, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश? सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच मात्र, आता काँग्रेसचा दुपट्टादेखील त्यांनी स्वीकारला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला. ‘माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही’ अशी ठाम भूमिका त्यांची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळवून, फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला. उद्धव ठाकरे तुमचा उरला सुरला उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन केला का?, असा सवाल भाजपने विचारला आहे.
उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश?
सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच मात्र, आता काँग्रेसचा दुपट्टादेखील त्यांनी स्वीकारला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला. ‘माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस… pic.twitter.com/yxxHFqJYSQ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 20, 2024