उद्धव ठाकरेंची परिस्थिती शोलेसारख्या जेलरसारखी!

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

उद्धव ठाकरेंची परिस्थिती शोलेसारख्या जेलरसारखी!

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी तशी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी, विरोधकांमधून जागावाटप संदर्भात अंदाजे आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआतील उबाठा गटाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  उद्धव ठाकरेंची परिस्थिती फार वाईट आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याला दिलेले भाषण ही एक हास्यजत्रा होती. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती केली आहे की, जसा शोले चित्रपट आहे तशी, आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे साथ आओ. जेलर सारखी त्यांची परिस्थिती झाली आहे. आता त्यांच्या पाठीमागे कोणी राहिले नाही.

हे ही वाचा : 

झारखंडमध्ये भाजपा ६८, आजसु १०, जेडीयु २, आणि लोजपा १ जागेवर निवडणूक लढणार!

म्हैसूर येथील मुडा कार्यालयावर ईडीचा छापा

बहराइच हत्या प्रकरणातील आरोपी बिर्याणी खाऊन सुटतील…

सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

उद्धव ठाकरे आता जेलर सारखे पुढे जात आहेत आणि पाठीमागचे सर्व निघून गेले आहेत. एक गाणे आहे, ‘कोई लौटादे मेरे बिते हुये दिन’ अशी ही परिस्थिती शरद पवार आणि काँग्रेसकडे मांडण्याचे काम ते करत आहेत. मात्र, दोन्हीही पक्ष त्यांना सोडून जात आहेत. आता उद्धव ठाकरेंची उपयुक्तता त्यांच्या दृष्टीने संपलेली आहे आणि याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

शरद पवारांनी काँग्रेसचा हात जेव्हा पकडला तेव्हा उद्धव ठाकरेंनी हा विचार केला पोहीजे होता की, बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते, ज्या दिवशी काँग्रेससोबत जावे लागेल त्या दिवशी शिवसेना बंद करू. उद्धव ठाकरेंनी हा विचार केला असता, आमच्या बरोबर नाराजी होती तर वेगळ काहीतरी करता आले असते. पण काँग्रेस बरोबर का गेलात हा प्रश्न आहे, असे बावनकुळे म्हणाले.

 

Exit mobile version