26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष'भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टपणा'

‘भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टपणा’

भाजप नेते बावनकुळेंची टीका

Google News Follow

Related

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेत्याने उत्तर दिलं आहे.संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही , असे उद्धव ठाकरेंनी टीव्ही ९ मराठी या वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा असल्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी भगव्या झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतं.अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेचा दाखला देत उद्धव ठाकरेंना बावनकुळे यांनी सुनावलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत.

हे ही वाचा:

‘विदेश दौऱ्याचे तिकीटही बुक झाले, खटाखट-खटाखट’

“सपा, काँग्रेस सत्तेत आले तर, रामलल्ला पुन्हा तंबूत जाणार”

टी-२० वर्ल्डकप भारत-पाक सामन्यांचे तिकीट २ लाखात!

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!

उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…

कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥

भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे.
जय महाराष्ट्र!, असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा