ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

वंचित बहुजन आघाडी 'वर' आणि 'खाली' शिवसेना

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची सोमवारी घोषणा झाली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.  या पत्रकार परिषदेच्या मागच्या बाजूस लावलेल्या बॅनरवरून उद्धव ठाकरे गटाची सध्याची काय स्थिती आहे हे कळून येते. या बॅनरवर वंचित बहुजन आघाडी हे नाव पहिल्या क्रमांकावर झळकले होते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खालच्या जागी टाकून त्यांची जागा दाखवून देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने दिले आहे, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

या बॅनरवरून शिवसेनेची सध्याची अवस्था कशी आहे हे दिसून येत आहे. शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे. शिवसेनेची दोन शकलं झाली असली तरी त्यांच्याकडे खासदार आहेत, आमदार आहेत. शिवसेनेला जुना इतिहास आहे. असे असतानाही शिवसेनेचे नाव वंचितच्या खाली कसा असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा :

अंदमान-निकोबारच्या अनामिक बेटांना आता परमवीर चक्र विजेत्यांची नावे

भारताच्या स्वदेशी पाणबुडीमुळे उडाली चीनची झोप

नेताजी तुम्हाला विसरता येणार नाही !

शिवसेनेला दुय्यम स्थान देण्यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, वंचित बहुजन आघाडी वर आणि खाली शिवसेना… काय दिवस आलेत यांना. ही सगळी उद्धव ठाकरेंच्या खंजीराची करणी आहे, असे म्हणून उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घरघर लागली. त्यांचे मुख्यमंत्री पद गेले, सत्ता गेली. हातांनी मोजता येतील इतकेच आमदार आणि खासदार उरल्यानंतर त्यांचे महत्त्व कमी झाले. एकेकाळी ज्या संभाजी ब्रिगेडनी शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली, त्याच संभाजी ब्रिगेडसमोर युतीसाठी उद्धव ठाकरे यांना पाऊल उचलावे लागले. संभाजी ब्रिगेडनंतर आता स्वतःच्या पक्षाला दुय्यम स्थान मिळत असले तरी त्यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केल्याची चर्चा आहे.

Exit mobile version