33 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेषउबाठाला मिळालेल्या जागा पाहता खरोखरच ते युतीत सडले का?

उबाठाला मिळालेल्या जागा पाहता खरोखरच ते युतीत सडले का?

आमदार अतुल भातखळकरांनी आकडेवारी दाखवत विचारला प्रश्न

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या निवडणुकीची तयार सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. महायुती आणि मविआकडून जागावाटप सुरु आहे. महायुतीमधून भाजपा-शिंदे-राष्टवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. तर मविआकडून शिवसेना उबाठा गटाची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसची अद्याप यादी प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी, मविआची काल जागावाटपा संदर्भात बैठक पार पडली आणि यामध्ये ८५ चा फॉर्म्युला ठरला, तर उर्वरित जागांवर मित्र पक्षांशी चर्चा केली जाईल, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मविआमध्ये तिन्ही पक्षांचा ८५ + ८५ + ८५ चा फॉर्म्युला ठरला आणि तिन्ही पक्षांनी सहमतीही दर्शविली. परंतु, मविआच्या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरेंना मिळालेल्या ८५ जागांवरून सर्वत्र चर्चा होत आहे. एकेकाळी भाजपा सोबत युतीमध्ये असताना शिवसेच्या वाट्याला १५० हून अधिक जागा यायच्या. मात्र, आता ती संख्या जवळ-जवळ निम्म्यापर्यंत आली आहे. युतीमध्ये असताना सडलो, असे उद्धव ठाकरे सर्वांना सांगत फिरत आहेत. मात्र, मविआमध्ये ८५ जागांवर उबाठाने दाखविलेली सहमती कोण, कुठे सडल? हे सर्व सांगून जाते. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटकरत, युतीत असतानाची शिवसेनेच्या आकडेवारीची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये युतीमधून मविआमध्ये गेल्याने उबाठाची सध्याची परिस्थिती काय हे दिसून येते.

अतुल भातखळकर यांनी ट्वीटनुसार, 

२०१९ ला तेव्हाच्या शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. – ५६ आमदार निवडून आले
२०१४ चा युती नव्हतीच, शिवसेनेने २८६ जागा लढवल्या होत्या – ६३ जागा जिंकल्या
२००९ मध्ये ठाकरेंना १६० जागा मिळाल्या होत्या – ४५ जागांवर विजय
२००४ ला १६३ जागा सेनेने लढवल्या होत्या – ६२ उमेदवार विजयी
१९९९ साली १६१ जागांवर शिवसेनेचे उमेदवार होते – ६९ जागा जिंकल्या
१९९५ मध्ये १६९ जागी शिवसेना लढली होती – ७३ जागांवर विजय

दरम्यान, ही आकडेवारी समोर आल्याने उबाठा भाजप युतीत खरच सडला का?, असा प्रश्न उपास्थित होत आहे. तसेच यंदाची निवडणूक पाहण्याजोगी असणार आहे, कारण शिवसेनेत दोन गट आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही विभागणी झाली आहे.

 

हे ही वाचा : 

प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १७० हून अधिक रेल्वे रद्द; कोलकातामधील विमान वाहतूक स्थगित

जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

पुण्यात पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा