विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे औसा मतदारसंघात प्रचारसभेसाठी गेले होते. दरम्यान, हेलीकॉप्टरमधून उतरताच आजही निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा प्रश्न संबंधितांना विचारला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वतःच शुट केला.
औसा येथे येताच बॅग तपासणी अधिकारी पुढे आले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवत त्यांच्याकडे ओळखपत्राची आणि कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी एक- एक करुन प्रत्येकाची नावं आणि विभाग विचारले. सगळे जण महाराष्ट्रातले आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. पुढे ते म्हणाले की, कधीपासून तपासणी करत आहात? कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या? असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर कर्मचाऱ्यांनी तुमचीच पहिली सभा आहे, असं उत्तर दिलं. त्यावर माझी पहिलीच? दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का? असा प्रश्न विचारत बॅग तपसणी करण्याची परवानगी दिली. माझा तुमच्यावर राग नाही, जो न्याय मला, तोच नरेंद्र मोदींनाही हवा, कारण तेही प्रचारसभेला आले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी सभेतही बॅग तपासणीचा मुद्दा उपस्थित करत चिडचिड व्यक्त केली. माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा :
बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?
रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!
नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन रद्द होणार?
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत
दरम्यान, काल वणी येथे असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. पुढे त्यांनी सभेत त्यांचा संताप व्यक्त केला होता. तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? दाढीवाल्या शिंदेंची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटवाल्यांची तपासायला हवी की नको? फडणवीसांची बॅग तपासायला हवी की नको? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.