ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधन करताना पंतप्रधान नरेंद मोदी यांना हुकूमशाह म्हटले होते.शनिवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.या प्रत्युत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात. सध्या नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागतोय उद्या चारचौघात भाषण द्यावं लागेल असा टोला ही उद्धव ठाकरे यांना लगावला.
शनिवार (२९ जुलै) रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संबोधन करताना सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.देशाच्या पंतप्रधानांना हुकूमशहा असल्याचे मेळाव्यात भाष्य केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका केली.
हे ही वाचा:
दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार
मणिपूरचा राग नाशिकमध्ये, १० पोलिस दगडफेकीत जखमी !
अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही
‘मणिपूरमधील संघर्षात परकीयांचा हात असू शकतो’
देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात.
माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल, असे बावनकुळे म्हणाले.