उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला!

नारायण राणे यांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला!

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय ८३ झाले तरी त्यांना मराठा समाजाला न्याय देता आला नाही. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. उलट पवारांनी राज्यात शांततेचा संदेश दिला पाहिजे. आम्ही सत्तेत येणार असे ते म्हणत असले तरी अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार नाहीत. वास्तविक मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण न करता तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला.

हेही वाचा..

जेजेपी आमदार देवेंद्र सिंह बबली यांचा भाजपमध्ये प्रवेश !

दंगलींसाठी उतावीळ कोण? का हव्या आहेत दंगली?

बॅडमिंटनमध्ये भारताचा जलवा, नितेश कुमारने मारलं गोल्ड !

मुस्लिम युवकाने कुराणची प्रत जाळत सनातनचा केला स्वीकार!

महाविकास आघाडीवाले म्हणतात की तेच सत्तेत येणार. मग आम्ही काय सत्ता द्यायला बसलो आहोत का ? असा प्रश्न विचारत नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या काळात दोन दिवस मंत्रालयात गेले होते. त्यांना अर्थ विभाग कळत नाही. मग कशाला मुख्यमंत्री व्हावे ? शिवसेनेत आता काही रस राहिलेला नाही, ४० आमदार सोडून गेले आहेत.

राजकोट किल्यावरील घटनेसंबंधी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राजकोटवर मी गेलो तेव्हा विजय वडेट्टीवार होते, त्याने येऊन हात वगैरे मिळवला. त्यानंतर काय घडले ते समोर आहेच. जयंत पाटील आले आणि म्हणाले, दादा जाऊ दे. मी सांगितले इथून मान खाली घालून जायचे, वर करायची नाही. तेव्हा जाऊ देतो, असेही राणे म्हणाले.

Exit mobile version