उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण

उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण

सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तुरुंगात जाऊन भेटण्याची शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांना भेटता आले नाही अशी माहिती समोर आली आहे.

ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात जाणार होते पण तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली.

जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावं असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत आर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर आर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या असा निरोप दिला. कोर्टाची परवानगी मिळाली तरी इतर कैद्यांना भेटण्यासाठी जी जागा आहे तिथेच भेटता येईल असंही तुरुग प्रशासनाने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

HDIL ची शितं आणि बॉलीवूडची भुतं; बाप बडा ना मैय्या सबसे बडा रुपय्या

वर्षा उसगावकर असे काय बोलल्या की त्यांना मागावी लागली माफी

मागच्या सीटवर बसणारे ७० टक्के लोक बेल्ट्स लावतच नाहीत

 

संजय राऊत मनी लौड्रिंग प्रकरणात अटकेत असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांची ही कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढली आहे. मध्यंतरी शिवसेनेचे काही नेते त्यांना तुरुंगात भेटण्यास गेले होते, पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारी संपादक या नात्याने लेख लिहिला होता. पण त्यावरून आक्षेप घेण्यात आला की, तुरुंगात असतानाही ते लेख कसे काय लिहू शकतात. त्यानंतर त्यांना तुरुंगातून लेख लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे.

Exit mobile version