भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्पात कमिशन मिळवण्यासाठीच ठाकरेंचा अदानींना विरोध होतोय”, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.तसेच “उद्धव ठाकरे उद्योगपती गौतम अदानी यांच्या खासगी विमानाचे वापर करायचे. ठाकरेंनी दिल्ली आणि संभाजीनगरला जाण्यासाठी अदानींचं विमान वापरलं होतं. विमान वापरल्याचे पैसे दिले नाहीत”, असे आरोप मोहित कंबोज यांनी केले आहेत.मोहित कंबोज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत.
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात १६ डिसेंबर रोजी धारावीत मोर्चा काढला.उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात धारावी ते बीकेसीपर्यंत पायी मोर्चा काढला.मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि गौतम अदानी यांच्याविरोधात टीका केली.उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री एक ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट केला.
हे ही वाचा:
विघ्नेश मुरकर युवा महोत्सव फोटोग्राफी स्पर्धेत पहिला
मुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटेकडे
सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!
पंजाबच्या तुरुंगात अंमली पदार्थांची विक्री, चुकीचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन!
ते व्हिडिओमध्ये म्हणाले, उद्धव ठाकरेंना अदानींकडून १० अब्ज रुपयांची वसूली करायची आहे. उद्धव यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचं आहे, ज्याचं डील काही दिवसांपूर्वी छोटे ठाकरेंनी केली आहे.“उद्धव ठाकरे उद्योगपती गौतम अदानी यांच्या खासगी विमानाचे वापर करायचे. ठाकरेंनी दिल्ली आणि संभाजीनगरला जाण्यासाठी अदानींचं विमान वापरलं होतं. विमान वापरल्याचे पैसे दिले नाहीत”, असे आरोप मोहित कंबोज यांनी केले आहेत. “धारावी पुनर्विकास प्रकल्पात कमिशन मिळवण्यासाठीच ठाकरेंचा अदानींना विरोध होतोय”, असाही आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.
ते पुढे म्हणाले की, गौतम अदानी कालपर्यंत तुमचे प्रिय मित्र होते. तुम्ही एकमेकांचे मित्र होते. अदानी तुमच्या घरी यायचे, तर कधी तुम्ही अदानींच्या घरी जायचे. आता तुम्ही त्यांचे एवढे विरोधक कसे बनले?”, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला. “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक वेळा गौतम अदानी यांच्याकडून फायदा करुन घेतलाय. तर मग आता कोणत्या टीडीआरच्या माध्यमातून वसुली पाहिजे की मातोश्री ३ बनवायचं आहे?”, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला.