जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

जळगाव येथे उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेत त्यांच्या भाषणाचा स्तर पुन्हा एकदा खाली घसरला. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, भारत या नावावरून गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा यावरून उद्धव ठाकरेंनी खालच्या भाषेत टीका केली.

फडणवीसांच्या शरीरावरून त्यांनी या सभेतही अभद्र भाषेत टिप्पणी केली. लोकांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही काय म्हणालात टरबुज्या? पण मी तसा माणूस पाहिलेला नाही. मोठं टरबूज असतं तसे मी पाहिलं नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल असलेली जळजळ व्यक्त केली.

 

 

एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली. त्यावेळीही त्यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री दिल्लीत कशाला गेलेत? तिथे काय बायडेन यांच्याशी चर्चा करणार आहेत का? ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी फोटो काढला. पण ते त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलले? ते जे बोलले ते यांना कळले का, की केवळ फोटो काढले असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर आपला राग काढला. जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याबद्दल ते म्हणाले की, जालियनवालाप्रमाणे इथे जालनावाला कांड झाले.

 

हे ही वाचा:

भारताच्या ‘RRR’ चित्रपटाने ब्राझीलच्या अध्यक्षांना केले मंत्रमुग्ध !

४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

‘स्वस्ती अस्तु विश्व’ हा संदेश देत जी-२०चा समारोप !

भारत- मॉरीशस राजकीय संबंधांना ७५ वर्षे पूर्ण; जी- २० साठी ‘अतिथी देश’ म्हणून विशेष आमंत्रण

उद्धव ठाकरेंना ‘ते’ पोस्टर झोंबले

 

 

आम्ही काँग्रेससोबत गेलो असलो तरी आम्ही शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. शिवसेनेची स्थापना भाजपाला पालखीत बसवून हिंडविण्यासाठी केलेली नाही, असेही ते म्हणाले. मुंबईत इंडी आघाडीची बैठक झाल्यानंतर मुंबईत काही ठिकाणी पोस्टर्स लागले होते. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता आणि त्यांचे एक जुने वक्तव्य लिहिण्यात आले होते. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे लिहिले होते.

 

 

आपल्या पक्षातील घराणेशाहीचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा जीव देशासाठी, जनतेसाठी जळत आहे. देशाला जागे करण्याचे काम माझ्याकडे वंशपरंपरागत आले आहे. जळगावच्या दौऱ्यात वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करताना त्यांचे स्टेड डगमगत होते. पण त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारप्रमाणे स्टेज डगमगत आहे. पण आम्ही सगळे देशप्रेमी एकत्र आलो आहोत.

Exit mobile version