राज्यात तयार झालेली महाविकास आघाडी किती संकुचित आहे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्देशून केलेले ट्विट. ठाकरे गटाचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे अमोल किर्तीकर हे उमेदवार जाहीर होताच संजय निरुपम यांनी शिवसेनेचा उल्लेख हा बची खुची शिवसेना असा केला आहे. त्यांनी जागा वाटप होण्यापूर्वी किर्तीकरांची उमेदवारी जाहीर केल्याने एक ट्विट करून त्यांनी जोरदार हल्ला केला आहे. ठाकरे गटाचे युतीचा धर्म मोडला असून कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा..
समृद्धी खानविलकरला राज्य टेनिसचे उपविजेतेपद
क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!
कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!
ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे हावभाव बदलले!
शनिवारी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांची उमेदवारी निश्चित केली. वास्तविक महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटप झालेले नाही. अशातच उद्धव ठाकरे यांनी किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने कॉंग्रेसचे माजी खासदार चिडले आहेत. त्यांनी तत्काळ ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. केवळ नाराजी व्यक्त केली नाही तर शिवसेनेला त्यांनी डिवचल आहे. त्यात भरीस भर म्हणून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेले अमोल किर्तीकर हे घोटाळेबाज असल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात किर्तीकर यांनी भ्रष्टाचार केला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा निरुपम यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला डिवचले होते. आता पुन्हा त्यांनी अमोल किर्तीकर यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना डीवचण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडीमधील धुसफूस जागा वाटप आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आता हळूहळू बाहेर पडू लागली आहे.
यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी २३ जागा आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले होते तेव्हा सुद्धा संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव ठकारे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाराष्ट्रात शक्ती किती राहिली आहे? त्यांची नक्की मत किती आहेत त्यावरच जागा वाटप करावे असे म्हटले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. केवळ समाज माध्यामामध्येच नाही तर वृत्तवाहिन्यानाही त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी एकसंध राहते का ? हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.