जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!

भाजपा कडून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडीओ ट्वीट

जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात सभा पार पडत आहेत. सभेसाठी नेत्यांच्या राज्यभर फेऱ्या सुरु आहेत. याच दरम्यान, विधानसभेच्या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची वणी येथे हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. केवळ आमच्याच बॅगेची तपासणी केली जाते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अधिकारी त्यांच्या बॅगेची तपासणी करत आहेत. भाजपाने हा व्हिडीओ पोस्टकरत, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

भाजपाने व्हिडीओ पोस्टकरत म्हटले, जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हीडिओ पहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली.

पोस्टमध्ये पुढे म्हटले, तत्पूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो ५ नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा : 

दिल्लीच्या हवेत सुधारणा नाहीच; उत्तर प्रदेशसह पंजाब, आसाममध्येही दाट धुके

ट्रम्प सरकारमध्ये एलॉन मस्क, विवेक रामास्वामी यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसीची जबाबदारी

शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांचे!

महायुतीची सत्ता आल्यावर बांगलादेशी, रोहिंग्या याना हद्दपार करू!

 

 

Exit mobile version