शिव्या दिल्या दानवेंनी, माफी मागितली ठाकरेंनी

अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना केली होती शिवीगाळ

शिव्या दिल्या दानवेंनी, माफी मागितली ठाकरेंनी

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर त्याविषयी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आणि माफीनामा सादर केला. विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माफी मागितली.

उद्धव ठाकरेंनी यामागे षडयंत्र असल्याचे म्हटले. अंबादास दानवे यांना आपली बाजू मांडू दिली नाही असे सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे प्रथमच घडले असे सांगत त्यांनी आपण महाराष्ट्रातील आईबहिणींची माफी मागतो असे सांगितले.

अंबादास दानवे यांनी सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याशी झालेल्या वादानंतर शिवीगाळ केली होती. तसा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यावर मग सभापती नीलम गोऱ्हे यांनी कारवाई करत दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या भाषणाचे अनेक भाग लोकसभा रेकॉर्डमधून हटवले

आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?

स्वराज्यप्रेरणा : राजमाता जिजाऊसाहेब

महाराष्ट्रात करोनाआला, त्या कुणाच्या अशुभाच्या सावल्या?

उद्धव ठाकरे म्हणाले की, या निलंबनाआधी चर्चा व्हायला हवी होती. त्यांची बाजू ऐकून घेतली गेली नाही. कुणाकडून मागणी झाली म्हणून निर्णय घेतला गेला. हा लोकशाहीच्या विरोधातील निकाल आहे.

सोमवारी विधान परिषदेत भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संसदेतील राहुल गांधींच्या वक्तव्यावर निषेधाचा प्रस्ताव मांडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून दानवे यांनीही आपले म्हणणे मांडले. तेव्हा समोर बसलेल्या प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात दाखविल्याचा आरोप करत त्यांच्यादिशेने दानवे धावले आणि त्यावेळी त्यांनी शिवीगाळ केली.

 

Exit mobile version