‘माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं, आताही स्वप्न पडत नाही’

उद्धव ठाकरे याचे शिर्डीत वक्तव्य

‘माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं, आताही स्वप्न पडत नाही’

शिर्डीच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपलं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही तसं स्वप्न पडत नाही. मी सत्तेतून निवृत्त होणार नाही, सत्तेतून मला कुणी निवृत्त करू शकत नाही, असे म्हणत आपली भूमिका व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जुन्या पेन्शनचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत त्यांना महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्याची हाक दिली. आंदोलन असे करा की, ते सत्तेशिवाय उपाशी राहिले पाहिजेत. तुम्ही उपोषण करू नका. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमची जुन्या पेन्शनची योजना अमलात आणल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण माहीत नव्हती ते लाडकी बहीण योजना घेऊन आले, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरील राग त्यांनी पुन्हा आळवला.

उद्धव ठाकरे यांनी या भाषणाला सुरुवात करताना माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावानो अशी सुरुवात केली. शिवाय, आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडील चोरले याचाही पुन्हा एकदा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले की, माझ्याकडे काहीही नाही. तरीही तुम्ही मला बोलावत आहात. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे, अशी सहानुभूतीही मिळविली.

हे ही वाचा:

राहुल गांधी हेच एक नंबरचे अतिरेकी

‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

ज्ञानेश महारावांवर गुन्हा दाखल करा

ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’

उद्धव ठाकरे यांनी त्याआधी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. नंतर ते जुन्या पेन्शन योजना संघटनेच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. उद्धव ठाकरे हे २०१९मध्ये मुख्यमंत्री बनले होते. पण आता महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाला पाठिंबा दिला जात नाही. त्यांच्या पक्षाकडून मात्र सातत्याने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचेच नाव पुढे केले जात आहे. शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. उलट ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतली आहे.

Exit mobile version