उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… 

भाजपा आमदार निलेश राणे यांचा टोला

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… 

महायुतीतील ३९ आमदारांनी काल (१५ डिसेंबर) कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळात   भाजपाच्या ९, शिंदेंच्या ६ आणि अजित पवार गटाच्या ५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या  नितेश राणेंचाही समावेश आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुडाळ-मालवण मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार आणि त्यांचे भाऊ निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा, असे टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

निलेश राणे ट्वीटकरत म्हणाले, श्री. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो.

उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल. जय महाराष्ट्र, असे निलेश राणे म्हणाले. 

 

हे ही वाचा  : 

दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!

जे आपल्याकडे होते ते उद्या नसेल…मी नाराज नाही!

पॅलेस्टाईनचा उल्लेख असलेली पिशवी घेऊन प्रियांका गांधी संसदेत

विजय दिवसानिमित्त माणेकशॉ सेंटरमध्ये आत्मसमर्पण पेंटिंग स्थापित

Exit mobile version